स्वप्न?!


सगळी घरं, एकाच रंगाची
अन एकच ढाचा आतल्यांचाही
तेच सगळ ह्याच्या घरात, त्याच्या घरात,
आणि त्याच्या देखील
तेच ते चकाकणारे दाखवायचे दात
शुभ्र पांढरे सारख्याच मापाचे
तेच हास्य आणि तेव्हढंच
जेव्हढं मावेल चेहऱ्याच्या क्षेत्रफळात
आणि जेव्हढं भावेल भूमितीच्या नियमांना.

तेच बेत शिजतात प्रत्येक स्वयंपाक घरात
आणि प्रत्येक दिवाणखान्यात
तीच मोजदाद आनंदाची
प्रत्येक carry – bag घरी आणल्यानंतर
तीही warrenty सहित.

मग प्रश्न उरतोच कुठे तुलनेचा
चांगल वाईट, खर खोट, नैतिक -अनैतिक…
मनही सगळी एकाच दगडातून एकाच साच्याने पाडलेली

नाहीतरी समानतेच स्वप्न त्यांनी पाहिलंच होत!

Advertisements
 1. आहा..एकेक ओळ वाचत होतो..अधिकाधिक आवडत होती. एकदम भिडणारी सुंदर अप्रतिम वगैरे विशेषणे आपोआप जमा होत होती आणि त्यात शेवटची ओळ आली.

  “नाहीतरी समानतेच स्वप्न त्यांनी पाहिलंच होत!”

  हा तर त्या सुंदरतेचा अनपेक्षित अतिझकास कळस..

  आधीचे सगळे कौतुकाचे शब्द फिके पडले.

  सोनल..लाजवाब.. क्या बात्..आहा.

 2. क्या बात सोनल..खूप छान 🙂

  • sonalw
  • जानेवारी 5th, 2011

  Thanks Suhas.
  Thanks Nachiket, BTW jara tujha email ID sms karshil? I dont have access to my personal mails.

 3. व्वा! खूपच छान. अगदी मस्त. खरय तुझ म्हणण. सगळ्या घरामध्ये एकच तर दिसत चित्र. तेच-तेच सगळ…

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: