almond apricot temptation


काल चोकलेट खायची जाम तल्लफ आली होती. अगदी Irresistable. नवर्याने चांगल्या नवा-यासारखं ते आणल सुद्धा माझ्यासाठी खास.
प्रोब्लेम तिथूनच सुरु झाला. पिल्लू ला न दाखवता खायचं अस ठरवलं होत. चांगल्या हेतूने तिला वळण वगैरे लावण्यासाठी. पण मग झाल कि युद्ध सुरु.
म्हणजे नेहमी प्रमाणे माझ्यातली मी माझ्याशी भांडायला लागली.

“स्वार्थी कुठली. एकेकटी खातेस?”
“अग पण तिला सवय लागेल म्हणून देत नाहीये…”
“जे वाईट ते तुझ्यासाठी पण वाईटच. तुला काय ते डॉक्टरांनी पौष्टिक म्हणून खायला सांगितलाय?
“(अरे बापरे..पकडलं कि मला हिने)दात किडतात, जंत होतात, भूक मंदावते…:”
“अच्छा ? मग दात घास तिचे. आणि जंत वगैरे काय फक्त चोकलेट ने होतात? एका तुकड्याने काय होणारे अस? “
(कसनुशा चेह-याने) ते बरोबर आहे पण..मी असं ऐकलय कि ते सर्दी कफासाठी चांगलं. हल्लीच वाचलं होत. मला झालीये जरा सर्दी मग म्हटलं औषध म्हणून बरं आहे…”
” हो गं टवळे? तिला पण झालीये जराशी सर्दी. तिला जंत होतील आणि तुझी सर्दी बरी होईल काय? आई आहेस का कोण?”
“तसं नाही, पण ते दिसलं कि ती खायची थांबणार नाही. ”
“हो का? थांबायचं कोणी? तिने? त्या त्या ३ वर्षाच्या चिमुरडीने? कि तू? ३३ वर्षाच्या म्हशीने? तुला नाही थोपवता येत लहर. तर तिने ग कशी थोपवायची? दुष्ट कुठली (and BTW this applies to not just that chocolate, but each and every habit of you *** elders…)”
.
.
.
.
.
.
.
ठेवलय purse मध्ये…almond apricot temptation . घरी गेले कि आधी पिल्लूला भरवणार आहे तिचं मन भरे पर्यंत. नंतर आहे आमची देशी मेस्वाक.
तसंही बदाम आणि जर्दाळू तसे चांगलेच ना? healthy वगैरे?
काय?

Advertisements
 1. हे हे ..दे ग पिल्लुला एक तुकडा काही नाही होत त्याने 🙂

  तसंही बदाम आणि जर्दाळू तसे चांगलेच ना? healthy वगैरे? >>> Yup 🙂 🙂

 2. हेहे.. आईस्क्रीम, चॉकलेट, पेप्सी च्या वेळी अगदी अगदी अशीच घालमेल होते ! मस्तच मांडलं आहेस..

  • Bhavinee
  • जानेवारी 13th, 2011

  Loved this post 🙂

 3. गोड पोस्ट …. 🙂

  • sonalw
  • जानेवारी 17th, 2011

  🙂 Thank you Bhavinee, Devendra!

  • Smita
  • जानेवारी 28th, 2011

  masta ahe, ekdam representative!:-) sagaLech lekh, katha, kavita, haLuhaLu vachtiye..

  • Mar
  • जानेवारी 29th, 2011

  masta ahe, ekdam representative!:-) sagaLech lekh, katha, kavita, haLuhaLu vachtiye..
  +1

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: