मा exchange


“मा exchange”
सोनी TV वरचा हा नवीन रिअलिटी शो.
“talent shows” मी समजू शकते.
‘स्पर्धा’ हा concept अनादी काळापासून अस्तित्वात आहे. अगदी देवा दानवांपासून. महाभारतात पहिल्यांदा कौरव पांडवांनी आखाड्यात उतरून स्वतः ची कौशल्य दाखवली तो talent show च होता. आणि रामायणात शिव धनुष्य पेलण्याची स्पर्धाच होती.

गाणं, नाच, पाककला, धाडस अशा अनेक कौशल्यांना हाताशी धरून अगणित ‘Reality cum Talent cum drama shows’ चालू आहेत. काही यशस्वी, काही अयशस्वी. प्रत्येक show ला business angle आहेच. किंवा म्हणूनच तो शो अस्तित्वात आहे. नाहीतर समाजसेवे साठी आजच्या जमान्यात अशा गोष्टी कोणीच करत नसतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावनांना आवाहन करून sms वगैरे करायला लावण हेही आता नेहमीचं झालंय. त्यातूनही जो प्रेक्षक शहाणा झाला तो झाला, नाही तो अजुनही स्वतःच्या खिशाला भोक पडून sms करतो. कधी कधी स्पर्धकाचे पालक sms manipulate करतात हा सुद्धा भूतकाळ.
पण निदान, किमान पक्षी तिथे कोणाच्या तरी गुणांना व्यासपीठ मिळत होत. किंवा मिळतंय. कधी कधी अत्यंत गरजू गरीब गुणी मुला मुलींना या शो ने आधार दिलाय हे मान्य कराव लागेल.
पण पूजा बेदी ला का बाबा हवाय आधार? मानसिक, कि आर्थिक? तिने का बुवा दुसर्याच्या घरी कामवाली म्हणून जावं? ती काय किंवा इतर कोणीही lokhandwala किंवा पाली हिल किंवा तत्सम ठिकाणी १० नोकर हाताशी असलेल्या जमातीतल्या कोणीही…काय गरज?

भावनिक आवाहन करणं, प्रेक्षकांचा कौल मागण आणि भावनांशी खेळण यात खूप मोठा फरक आहे.
business करणं आणि विवेक सोडून प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडण यात फरक आहे.
निदान माझ्या सारख्या आणि तुमच्या पैकी कित्येकांसारख्या पापभिरू कुटुंबात वाढलेल्या माणसांच्या लेखी तरी तो फरक अजूनही जिवंत आहे.

स्वयंवराच्या निमित्ताने ‘लग्न’, ‘प्रेम’, वगैरे आणेल हळुवार भावनांचा व्यापार मांडून झाला. त्यात स्वतःच्या भावना विकायला participants तयार झालेच आणि चवीने पाहणारे निर्लज्ज प्रेक्षकही त्या विकत घ्यायला तयार झाले!
‘पती पत्नी और वो’ च्या निमित्ताने या व्यापाराने एक पाउल पुढे टाकलं. पालक आपली मुलं विकायला निघाले. celebrities वात्सल्य विकायला निघाले.
आणि आता ‘मा exchange’. आई कशी बदलू शकते? आणि का बदलावी? पैसे कमावण्याच्या आणि सतसत विवेक बुद्धी गमावण्याच्या या घाणेरड्या खेळात सह कुटुंब सहभागी होण्याला कोणाचाही कसा विरोध नसू शकतो? पैशाचा माज, आणि हाव अजून किती विकृत होत जाणार आहे?
ज्यांना खरोखर आई बदलावी लागते किंवा मिळतच नाही त्यांना विचारा…समाजाचे कितीक हळवे जखमी कोपरे जगण्याची लढाई लढत असताना आपल्या media ला हा खेळ खेळावासा वाटतो, त्यात सफेदपोश, राजकारणावर आणि तत्सम गोष्टींवर हक्काने टीका करणाऱ्या समाजाच्या मोठ्या घटकाला सहभागी व्हावस वाटत ह्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली?
कुठलाच धरबंध नसणारे हे reality show अजून किती काळ चालणार? मायबाप प्रेक्षक अजून किती काळ चालून देणार?
एकीकडे
‘प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई…ह्या बाळकडू वर मोठी झालेली मी,
डोळ्यात प्राण आणून संध्याकाळी माझी वाट पाहणारी माझी छकुली,
“दूर देशी गेला बाबा” ऐकून ओक्साबोक्शी रडणारी सुद्धा माझीच पिढी.

आणि मेलेल्या भावनेने ‘मा’ exchange सारखे शो रंगवणारे आणि येवू घातलेल्या पिढीची विचार करण्याची शक्ती लयाला नेवू पाहणारे समाज द्रोही !

आई exchange करत मृत होत जायचं की सुख दुखः वाटून घेत समृद्ध होत जायचं..निवड आपली असायला हवी. आपल्यासाठी नाही…आपल्या पिल्लांसाठी. आपली दोन घटका ‘करमणूक’ हि त्यांच्या बुद्धीची, संस्कारांची आणि भावनांची ‘मरवणूक’ होऊ नये म्हणून.

Advertisements
 1. सर्वप्रथम बर्‍याच कालावधी नंतर ब्लॊगवर आल्याबद्द्ल स्वागत. मुद्दा खरच मनाला टोचणारा आहे. मी हा अजून कार्यक्रम पाहिला नाही, परंतू जेव्हा प्रोमो पाहिला तेव्हा मनांमध्ये हाच विचार आला होता. माझ्यामते समाज जेव्हा आपली सांस्कृतिक मुल्य विसरून, दुसर्‍यांना अगतिकत करून आनंद मिळवू लागतो ना, तेव्हा तो समाज न राहता कळप बनतो. आपण सारे, कोणी स्वेच्छेने तर कोणी नाइलाज म्हणून त्याच दिशेने निघालो आहोत.

  • sonalw
  • जानेवारी 13th, 2011

  Thank you Sadanandji. .
  He thopwaayala hav he patunahi kahi karu shakat nahi. Nemaki hich gosht aswasth karate.

  • ngadre
  • जानेवारी 13th, 2011

  हलके घे गं सोनल. कोणीही टीव्हीला सिरियसली घेत नाही.उथळ टाईमपास आहे तो.. 🙂

 2. नचिकेत +१
  तरी पण हे असे शो का दाखवावे हा मुद्दा रहातोच.

  • sonalw
  • जानेवारी 14th, 2011

  🙂 मान्य. दोघांचही.
  बाकी दाखवणारे माझ्या सांगण्याने थांबणार नाहीतच. स्वतः ला कशासाठी आणि कोणाकडे गहाण टाकायचं हा त्यांचा प्रश्न आहे.
  मी फक्त सावध करतेय. आपल्याला हलके घे वगैरे समजत. मुलांना नाही. ते त्यांच्या subconcious मध्ये काय काय absorb करतात हे तुला मला कळत देखील नाही. केवळ म्हणून.
  आणि इतकी अस्वस्थ झाले कारण….आई पर्यंत पोचले रे ते…you know what I mean?

 3. मला तर अजिबात आवडत नाहीत ह्या सिरियल्स ….

 4. काय गम्मत आहे? माणसाने संवेदनशील बनलं की तो बावळट आणि नाही बनलं तर तो नालायक. वाह रे दुनिया.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: