सहज विषय निघाला म्हणून


ब-याच दिवसांचे पोस्टायचे राहिलेले एका मागून एक पोस्ट करणार आहे आज.
त्यातला हा पहिला पोस्ट.

सहज विषय निघाला म्हणून

रिकामटेकडा निरुद्योगी चहाटळ वारा
कसले कसलेसे गंध घेऊन आला
त्यातला एक तुझा वाटला आणि
नेहमीपेक्षा शिळा वाटला, म्हणून म्हटलं विचारावं
कोमेजायला काय झालं?
सहज विषय निघाला म्हणून, तशी मी तुला विसरलेलीच होते.

नदी भेटली परवा रस्त्यात
बराच वेळ सोबत चालली आणि
बोलता बोलता बोलून गेली
हल्ली म्हणे खडे मारणं वाढलंय तुझ?
म्हटलं तुला सांगाव, इतरांनाही टोचत बर!
सहज विषय निघाला म्हणून, तशी मी तुला विसरलेलीच होते.

पार म्हणाला आंब्याचा
बराच वेळ बसला होतास भर दुपारी
तुला आवडते म्हणून त्याने
एक कैरी भिरकावली
चुकून नेम चुकला त्याचा, रागावू नकोस हं त्याच्यावर.
हेही
सहज विषय निघाला म्हणून, तशी मी तुला विसरलेलीच होते.

“आहे का कोणी मैत्रीण तुझी?”
अस आत्या परवा विचारात होती.
“आमच्या मन्याला शोभेल अशी,
हल्ली फार चीड चीड करतो
त्याला ताळ्यावर आणेल अशी…”
सुचवू का तिला? विचारायचं होत
सहज विषय निघाला म्हणून, तशी मी तुला विसरलेलीच होते.

Advertisements
  • ngadre
  • फेब्रुवारी 11th, 2011

  ahaa..

  Khallas..

  Kiti mast.. Naveen naveen innovative writing cha class laavato tujhyakade.

  Mast perspective madhoon lihiles..

  • sonalw
  • फेब्रुवारी 11th, 2011

  Abhaar abhaar abhaar….:) kadhi yetos? tya nimittane tari bhetu aapan.(kinva tya nimittane tari eka mothya lekhakala bhetata yeil mala 😛

 1. Superb!!

  • sonalw
  • फेब्रुवारी 16th, 2011

  Thank you Suhas.

  • sahajach
  • फेब्रुवारी 16th, 2011

  मस्त सोनल 🙂 ….

  • sonalw
  • फेब्रुवारी 16th, 2011

  ag kiti divsanni Tanvi..thanks. Kashi aahes?

 2. अतिशय छान कविता. नेहमीच्या कविते पेक्षा वेगळी आणि खूपच मनाला स्पर्श करून गेली!!!

 3. मस्त मस्त मस्त! एकदम छान. कशाच्या तरी आडून अगदी मस्त शर संधान, ते ही वर्मी!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: