चहा- डी


प्यायची वेळ झाली की सारखे घड्याळाकडे लक्ष जाणे, घशाला कोरड पडणे, मन एकाग्र न होणे, एकदाची धार पेल्यात पडली कि हायसे वाटणे आणि घशाखाली पहिला घोट उतरला कि जीव शांत होणे.
हे बरेच दिवस होतंय माझ्या बाबतीत.
नाही मी बेवडी नाही आहे. पण मी चहा-डी आहे. आणि हे post मी माझ्या चहा-ड्या (चहा-द्या अस वाचलात तर चूक तुमची नाही) सांगणार आहे.

तर झाल अस…
“साखर म्हणजे पांढर विष” अस आमच्या फ्यामिली वैद्यांनी सहा वर्षापूर्वीच सांगितलं होत. नंतर सुद्धा बर्याच ठिकाणी वाचलं ऐकलं होत. पण जसं वाचलं तसं सोडून सुद्धा दिलं. पण परवाच्या lecture नंतर साखर actually सोडण्याचा निर्णय घेतलाच शेवटी. incentive ? माझी dangerously scary low calcium index. अंशतः का होईना साखर बंद केल्यावर improve होईल.
तशी मी गोड खात नाही फार. जी काही साखर जाते ती चहातून. पण चहा म्हणजे माझा अशक्त बिंदू (weak point). सकाळ संध्याकाळ दुपार आणि जमलाच तर अधे मध्ये मला चहा लागतो(च) .
पहिला दिवस तसा सोपा गेला. रविवार, सुट्टी, मनसोक्त झोप म्हणून असेल. पण तल्लफ नाही आली.
सोमवार उजाडला आणि परीक्षेला सुरवात झाली. सकाळी चहाची तहान दुधावर भागवली. पण नंतर भरपूर कार्बन खाऊन पिऊन जेव्हा office ला पोचले आणि समोरच हसतमुखाने आल्याच्या वासाने दरवळणारा चहा सर्व करणारा रामलाल दिसला…
“प्रत्येक साखरेचा चमचा तुमच्यात acid निर्माण करतो आणि तिला neutralize करण्यासाठी तुमच्या हाडातून calcium घेतलं जात. हे काम तुमचा body police trillianth of seconds मध्ये करत असतो.”
कानात घुमल आणि माझ्या लढाई ला सुरवात झाली.
बिन साखरेच्या चहाचे नखरे इथे पुरवणार नव्हत कोणी. आणि साखर बंद म्हणून चहा बंद हे सुधरत नव्हत.
“चहा मधलं tanin तुमच्या आहारातल्या फेरस च फेरीक मध्ये रुपांतर करत जे शरीर वापरू शकत नाही.” पुन्हा आकाशवाणी.
पण माझ्या शरीरात सध्या सापडलेला कार्बन डाय ओक्साईड tannin carbonate मध्ये रुपांतरीत व्हायला आसुसलेला होता.

योगायोग असा कि सध्या हातात ‘मुक्तांगण ची गोष्ट’ आहे. चहा बघून माझी अवस्था फार वेगळी आहे त्या दारूड्यांपेक्षा अस अजिबात वाटत नाही. आणि यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. चहाचे परिणाम दारू किंवा गर्द इतके भीषण नाहीत यात मी नवीन काय सांगायचं. पण मनाची घालमेल? तीच मोजमाप काय कराल? मी माझ्या डेस्क वर बसण काही वेळ (म्हणजे रामलाल अदृश्य होई पर्यंत) अक्षरशः टाळल. तो मला डेस्क वर बघेल मग चहा घेऊन येईल, मग कपाची किणकिण, आल्याचा वास, ती वाफ, तो चहा ओतल्याचा मंजुळ आवाज,….आह! ह्या सगळ्यावर मात करायची म्हणून मी थेट मुक्तांगण टेक्निक अमलात आणल. ‘त्या’ वेळेला ‘त्या ठिकाणी राहायचंच नाही. दूर जायचं, वेगळ्या विषयांवर, वेगळ्या माणसांमध्ये, राहायचं. ‘ती’ वेळ मारून नेण महत्वाच. माझी घालमेल, दूर जाणं
, फोन वर गुंतवून ठेवण स्वतःला सगळ ditto दारू सोडणाऱ्या माणसांसारख होत.
withdrawal symptoms? डोक दुखतंय सकाळपासून. याचमुळे का ते माहित नाही. सकाळ यशस्वी पणे निभावून नेलीये. आता दुपारचे ३ वाजलेत. पेंग अनावर झालीये, रामलाल ची वेळ जवळ येतेय. I am dreading the moment again.
मी साखर सोडतेय कि चहा ते कळत नाहीये. आणि व्यसन सुद्धा नक्की चहाचं आहे कि साखरेच तेही.
आजवर व्यसनाधीन माणसाला बघितलं कि ‘हे लोक अस कस करू शकतात’ अस नेहमी आपसूक विचारलं जायचं. आता कळतंय.
आणि मी सुद्धा मुक्तांगणचीच slogan follow करतेय.

“one day at a time’. 🙂

Advertisements
  • सुदर्शन
  • फेब्रुवारी 16th, 2011

  अबब चहा सोडण्याचे पातक?
  मला कल्पनाच नाही करवते. साखरेला लो कॅल स्वीटनर पर्याय करता यील. शिवाय रामलाल बिन साखरेचा चहा का नाही देणार?
  मी चहापासून दूर नेण्यापेक्षा अजून जवळ तर नेत नाहीये न? 🙂

 1. हा हा हा.. अगदी यातनंच जातोय सध्या.. कॉफी/साखर सोडायचे नाही तरी कमी करायचे प्रयत्न चालू आहेत. पण शून्य यश हाती लागतंय.. कदाचित ‘मुक्तांगणची गोष्ट’ हातात नसल्याने असेल 🙂

  • sonalw
  • फेब्रुवारी 18th, 2011

  @sudarshan…nahi nahi tu ajibaat vichalit karat nahiyes.
  @heramb, Muktangan… nakki waach. Hya sathi nahi pan in general, aaplyach swatahchya wadhisaathi. 🙂

 2. हो नक्की वाचायचंय. बरंच ऐकलंय आणि अवचटांच्या इतर पुस्तकातूनही मुक्तांगणबद्दल सतत ऐकलंय.. लवकरच !

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: