नाव


नात्यांची नाव शोधायची नसतात
नात्यांना नाव ठेवायची नसतात

नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे
त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे
‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे
‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे

ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी
जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी
ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी
परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी

ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी
आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी
नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली
बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली

नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधायचं?
कस सांगायचं आतापासून पुढे असंच वागायचं?

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?

नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती

म्हणूनच सांगू का
नात्यांची नाव शोधायची नसतात
नात्यांना नाव ठेवायची नसतात

Advertisements
 1. मस्त…
  पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो

  अस एडिट कर ना… 🙂

 2. काय झालं?? सगळं ठीक आहे नां??
  फक्त कविता म्हणून असेल तर उत्तम आहे.
  कॉमेंट प्रसिद्ध नाहीकेली तरी चालेल. काळजी घे.

  • sonal waikul
  • फेब्रुवारी 25th, 2011

  nahi kaka. hi fat kavita aahe. thoughts. mi ekdam wyawasthit aahe. Naatyanchya babtit mi kharach khup sudaiwi aahe ho. touch wood.
  aata hech bagha na. Tumachya saarkhe kaka aahet na kaalji ghyayla 🙂 konala miltaat ase? itakya lambun mala kadhi baghitaleli suddha nastaana majhi itaki kaalji ghenare?
  ya asahch naatyanchi naw shodhaychi nastaat.
  thank you very much.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: