Value add, Big Picture and the list goes on.


Value add
Big picture
Solution Providers
Unique selling Proposition
Strategic view
Competitive benchmark…and the list goes on.

तुम्हाला कंटाळा नाही येत असल्या बडबडीचा?
ह्या शब्दांचा?
मला तर अक्षरशः आजकाल वीट येतो. आई शपथ . बोलणाऱ्याच्या डोक्यात वीट घालावी इतका वीट येतो.
काय त्या बोलण्यातला आव, अहाहा. आणि त्याच वेळी आपण करत असलेली थुकपट्टी. आहाहाहाहा. ती लपवायला वरून छान छान packaging. वाह वाह क्या बात क्या बात.
सुरवातीला हे असले शब्द आपल्या manager कडून ऐकताना कोण अप्रूप वाटायचं काय सांगू! आपण चक्क मोठे झालोय अस काहीतरी. ते शब्द वापरताना तर मनातल्या बेडकीचा बैल व्हायचा फुगून. कॉलेज मधले टवाळ पाचकळ विनोदांच्या कोट्यांचा डोंगर रचणारे ते आपणच कि आणखी कोण?
आणि हे काही कळण्या सवरण्याच्या आतच लक्षात आलं कि आपण त्या ‘corporate world ‘ चा एक भाग होऊन जुने झालोत.
हळू हळू टेबलाच्या ह्या बाजूकडून त्या बाजूकडचा प्रवास सुरु झाल्यावर बर्याच गोष्टीतला भंपकपणा जवळून पाहायला मिळाला.
च्यायला, (sorry . s o r i सॉरी ) ह्या client ला सांगायचं अमुक ढमुक कर म्हणजे तुझ्या अ ब क competitors ची चांगली जळेल. आणि त्याचवेळी अ ब क कडे पुढच्या प्रोजेक्ट साठी खडे टाकून ठेवायचे. हे असले धंदे सरळ सरळ सुख सुखी जमले नसते बुवा आपल्याला बापजन्मी. पण ज्याच्या कडून पगार घेतोय त्याचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्याचं पोट ह्याच धंद्यावर ह्याला काय म्हणायचं! (नोकरी ह्या एका सरळ सोप्या शब्दात आत आत किती खाचा खोचा..कारकुनाच सुद्धा नोकरीच आणि CEO ची सुद्धा नोकरी च. हॉटेलात पो-या म्हणून लागला तरी नोकरीच आणि VP marketing सुद्धा नोकरच. जाऊ दे विषयांतर झाल)
नाही म्हणायला collectively कुठे तरी काहीतरी चांगलं घडतंय असं म्हणायला थोडा वाव आहे म्हणून ह्या थोडयाशा हलकटपणाच ओझ सहन करता येईलही. पण अंदर कुच कुच धुमसता हैहीच न?

शब्द मुके फोल फोल म्हणून सोडून देता येतीलही.
त्यांच्या मागची जाणीव मात्र दुकःरी खुपरी होत जाईल.
त्याचं सांगा कराल काय?

व्यवहार म्हून सोडून द्याल विवेकाची देव घेव
इमान नावाचा भुंगा मात्र पोखरत राहील आतून जीव
त्याचं सांगा कराल काय?….

Advertisements
 1. अंदर कुच कुच धुमसता हैहीच न?
  अगदी खरंय. सगळं सोडून् फोटोगिरी करत भटकावं असं वाटतंय. पण तू म्हटल्याप्रमाणे collectively कुठे तरी काहीतरी चांगलं घडतंय असं म्हणायला थोडा वाव आहे म्हणून ह्या थोडयाशा हलकटपणाच ओझ सहन करतोय.

 2. thanks Pankaj…Tathastu.
  ekdatari dewane mala hi security sodun manmani jagnyach dhadas dyaw ashi mazi jam iccha aahe. aani bahutek aaplya saglyanchich. 🙂

 3. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणत असाल तर बर्‍याच अंशी मान्य.
  वर वर जरी ते चुना लावणे भासत असले तरी त्याला मी बर्‍यापैकी डॅमेज कंट्रोल म्हणतो.

  बाकी लोकं का करतात ह्याला उत्तर नाही, करणे आवडत असेल तर तुम्ही ते एंजॉय कराल, तुम्हाला त्यात मजा येऊ लागेल.
  आवडत नसेल तर हे करता येणारच नाही, संयमाचा बांध लगेच फुटुन जाईल.

  – छोटा डॉन

 4. maany. mhanunach mhatal…”thodasha halkatpanach oz….” 🙂

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: