कायद्याने ते समान…


तो ‘तो’, ती ‘ती’
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान.

ती पहाटे गजर लावून उठते.
तो सकाळी ओव्या ऐकून
गजर ‘तो’, ओवी ‘ती’
हिशोब तसा बरोबरच
कायद्याने ते समान.

तिची धावपळ, त्याचा आरडओरडा
तिची आवराआवर, त्याचा पसारा
ती करते त्रागा, तो घालतो समजूत
त्रागा ‘तो’ समजूत ‘ती’
हिशोब पुन्हा बरोबर
कायद्याने ते समान

तिची नोकरी, त्याचा जॉब
तिची अब्रू त्याचा आब
संसाराचा गाडा ‘तो’ हाकतो
संसाराचा गाडा ‘ती’ ओढते
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान

तिच्या पोटी त्याचा अंश
ती वाढवते त्याचा वंश
वंशाचा दिवा देवाच्या ताटी
धनाची पेटी व्यवहारासाठी
दिवा ‘तो’ पेटी ‘ती’
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान

न्याय देणारी देवता ‘ती’
निर्णय घ्यायला लावणारा कायदा मात्र ‘तो’
त्याच्या लेखी फरक फक्त एका रेषेचा
ताठ उभ्या मात्रेचा आणि वाकलेल्या वेलांटीचा
त्याच काय घेऊन बसलात एव्हढस?
कायद्याने ते समान…

Advertisements
  1. आमच्या मते हे पूर्ण सत्य नाही… तरीही बऱ्याच मोठ्या वादविवादाचा विषय मात्र नक्कीच आहे…

  2. @ती मात्रा आणि तीही वेलांटी
    Thank you ‘ti matra’.
    Ho he purn satya nahich. ha fakt ya wishayakade baghnyaacha ek chhotasa bhaag/ angle aahe. ha wishay khup motha aahe aani tyaala barech kangore aahet.
    aaplya bhaartiy samajacha , sarkaarcha stree-purush samanate kade baghanyacha soyiskar aani mhanunach dambhik drushtikon ha ya kavitecha wishay aahe. to nakkich pratyek maansaala laagu honarhi naahi.

  3. हे चित्र बदलेल, बदलत आहे, हा माझा आशावाद नसावा ह्या आशेसह… अप्रतीम!

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: