कदाचित


कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित

येतील जातील श्वास नेहमीच्या सवयीने
तुफानाची ओढ मात्र त्यांची सरेल कदाचित

बरगड्यांच्या आतलं यंत्र उघडेल झडपा नेमाने
धडधडण्याची खोड मात्र त्याची जिरेल कदाचित

नियमानुसार शास्त्राच्या तहान भूक सुद्धा लागेल
तुझ्यासाठी ताटामधला घास उरेल कदाचित

ओली होईल पावसाने आणि थंडीत कात थरथरेल
मोहरण्याची जाणीव मात्र तिची विरेल कदाचित

तारीख बदलेल दिवसागणिक सगळ सगळ तसंच होईल
रिकाम्या, सुन्न मनात ओळख माझी झुरेल कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित  

Advertisements
 1. ” तारीख बदलेल दिवसागणिक सगळ सगळ तसंच होईल
  रिकाम्या, सुन्न मनात ओळख माझी झुरेल कदाचित ”

  अप्रतिम. खरच अप्रतिम. खुप आवडली.

 2. अप्रतिम …

 3. reyaliti aahe khupach hhan awdli

 4. ओली होईल पावसाने आणि थंडीत कात थरथरेल
  मोहरण्याची जाणीव मात्र तिची विरेल कदाचित
  मस्त ओळी …. झक्कास.

 5. Thank you Sujit, Suhas, Varsha, Anuvita. 🙂
  Yet raha.

 6. One of the best Poem… Nice one…

 7. khasch.. kadachit

 8. kadachit tila he sagal samajal asat tar

  • abhi kul
  • जुलै 10th, 2014

  बरगड्यांच्या आतलं यंत्र उघडेल झडपा नेमाने .. khaas, masta!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: