झालं होत फक्त एवढंच


आज यातलं काहीच दिसलं नाही
रस्ते, खड्डे
धूर, धूळ,
घाण, चिखल
बातम्या, पोस्टर्स

आज यातलं काहीच खुपलं नाही
गजर, बडबड
कलकल, आवाज
ह्याची चरबी
त्याचा माज

आज यातलं काही झालंच नाही
चिडचिड वैताग
धांदल, गडबड
त्रागा, तगमग
तडफड, कडकड
.
.
.
झालं होत फक्त एवढंच,
कालचा दिवस संपताना
तू माझ्या आणि मी तुझ्या मनावर अलगद हात ठेवला होता.

  • Tanvi
  • September 6th, 2012

  पहिल्या तीन कडव्यातल्या बाबींच प्रमाण पहाता असा अलगद हात कायम ठेवणं आणि असा मनावर पाखरण करणारा हात आपल्याकडे आहे हे नं विसरणं इतकंच हातात आहे गं…

  मेहेमीप्रमाणे मनापासून आवडलं तूझं म्हणणं 🙂

 1. @Tanvi
  Tujhi comment nehmipramanech halawi aahe Tanvi. tujhyasaarkhich. 🙂 Thanks

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: