Posts Tagged ‘ कंटाळा ’

dedicated to कंटाळा blog!

बंडी: ए बंड्या,
(बंड्या अर्धवट पेंग्लेला आहे..)
बंडी: (वैतागून) अरे ए…बंड्या, उठ न..
बंड्या: (डोळे चोळत उठतो) काय झाल?
बंडी: मला बोर होतय…
बंड्या: म्हणजे कसं?
बंडी: कसं काय? मला बोर होतय म्हणजे बोर होतय..
बंड्या: कसं म्हणजे असं की अहमदाबादी बोर की चन्या मन्या? की मधली साइज़?
बंडी: शी कसला बोर आहेस तू सुद्धा…उपाय सुचावाय्चा सोडून फालतू बडबड!
बंड्या: फालतू नाहिये हे..जाम अर्थ आहे ह्याच्यात. म्हणजे जर चन्या मन्या बोर असेल तर त्याच्या qualities वेगळ्या असतात. ते बोर कसं रंगीत असत..जरा आम्बट गोड, त्याला मीठ मसाला लावला की ते जरा जास्त tasty होतं.मग खायला मजा येते. तसाच त्या टाइप चा कंटाळा असतो. जरा थोडा मीठ मसाला लावला ना e.g. एखादी मूवी, थोडं शौपिंग, किंवा एखादं crispy chicken वगैरे खाल्लं की जातो तो. infact मग आपण त्याला थैंक्स म्हणतो आल्याबद्दल..कारण तो आला नसता तर आपण असा willing break घेतला असता का लाइफ मधे? अशा विचाराने.
पण जर का अहमदाबादी बोर असेल न तर खल्लास. काहीच होवू शकत नाही. कारण ते बोरच पांचट असतं मुळात. त्याला कशाने चवच येत नाही. रंग पण बकवास असतो. आणि साइज़ पण मोठा. या टाइप चा कंटाळा पण तसाच असतो. काहीही केलं तरी जात नाही. त्याला फार profound उपायांची गरज असते. म्हणजे अत्तिशय deep sleep. किंवा कोणाला तरी आतिशय मनापासून झोडून काढ़णे किंवा जोरात ओराडणे गच्चीत जावून. जेणे करून मनाच्या अत्यंत तळा गाळात साचलेला जो कंटाळा आहे तो बाहेर पडून त्याचा निचरा होईल. याला भडास काढ़णे असेही म्हणतात. पण त्यातही rule असतात. deep sleep मधून संध्याकाळच्या वेळी जाग येवू द्यायची नाही. मग कंटाळा अजुनच गहिरा होतो. जाग ही सकाळी ८ नंतर येणं Must आहे. जोराने ओरडण्याची लाज वाटता कामा नए. कारण तसं झालं तर थोडासा कंटाळा शिल्लक राहतो आणि मग तो दुप्पट वेगाने पुन्हा हल्ला करतो.
पण हा rule झोडून काढताना वापरू नए. कधी कधी कंटाळ्या एइवजी माणुसच शिल्लक न उरण्यचि भीती असते…आल लक्षात?
बंडी: मला अहमदाबादी बोर झालय. मी हाच उपाय करावा म्हणतेय…सध्यातरी तूच आहेस समोर…(बंडी हत्यारांची जमवाजमव करेपर्यंत बंड्या पळुन जातो)