Posts Tagged ‘ गांधीजी ’

गांधीजींना आता तरी सुखाने जगू द्या

आजच्या मटा मधे बातमी आहे की Mr. ओटिस यांनी गांधीजींच्या वस्तू भारत सरकारला सोपवण्याच्या बदल्यात काही अटी घातल्या आहेत. त्या अशा की
१. भारताने शस्त्रास्त्रांवरचा खर्च कमी करावा.
२. गरिबांच्या विकासासाठी अधिक पैशाची तरतूद करावी.
तरच लिलाव थाम्बवण्यात येइल.
ही बातमी वाचून खर सांगू का माझ्या तळ्पायचि आग मस्तकात गेली.
अर्थात भारत सरकारने या मागण्या धुडकावल्या आहेत.

एक व्यक्ति जिच्याकडे भारताच्या सर्वात महान नेत्याच्या काही वस्तू आहेत, तिने त्यांचा लिलाव मांडला आहे. तसे होवू नए म्हणुन भारत सरकार त्या मिळेल त्या किमतीत विकत घेवू इच्छिते.
भावना एकट्या सरकार ची नसून लाखो भारतीयांची आहे. हे समजून न घेता एक परदेशस्थ व्यक्ति आपल्या सरकार ला चक्क blackmail करते.  कोण हे Mr. ओटिस? त्यांनी गांधीजींच्या अमूल्य वस्तू जपून ठेवल्या या बद्दल कृताद्न्यता व्यक्त करायची का हे आता कळत नाही. त्या वस्तू जपून ठेवण्यामागे या व्यक्तीचा स्वार्थ नसेल कशावरून? तसे नसते तर त्यांनी या वस्तूंचा लिलाव का मांडला असता? त्या भारत सरकारच्या सुपूर्त का केल्या नसत्या? आणि या अटी सरकार ला घालताना आजवरचा भारताचा इतिहास लक्षात घ्यावासा अजिबात वाटला नाहिका? इतिहास अशासाठी की भारताने आजवर कधीही आपल्या सैन्याचा किंवा शस्त्र बलाचा दुरूपयोग केलेला नाही. मग ही अट कशासाठी?
एकीकडे पाकिस्तानात दहशतीला खुले आम ख़त पाणी मिळत असताना देखिल अमेरिकेचे सरकार त्यांना लश्करी आणि आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव विचारत घेते आणि त्याच देशाचा एक नागरिक गांधीजींच्या वस्तुंचा लिलाव थाम्बवण्याच्या बदल्यात भारताला सैन्यावरचा खर्च कमी करायला सांगते!

गांधीजींची मुल्ये जपणे हे त्यांच्या वस्तू जपण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे हे आज स्वातंत्र्या नंतर इतक्या वर्षात न आपल्या देशाला कळले , नाही त्या वस्तू जपून त्यांचा बाजार मांडणार्या अभाग्याला, आणि नाही त्यांची तस्बीर आपल्या आलिशान केबिन मधे लावणार्या त्याच्या राष्ट्रप्रमूखाला!