Posts Tagged ‘ रंग ’

Happy Holi

आज होळी. रंगांचा सण. रंग ही संकल्पनाच किती व्यापक आहे नाही? प्रत्येक रंगाशी काहीतरी भावना, कुठेले तरी संकेत, काही आठवणी, कुठला तरी मूड असे काही काही जोडलेले असते. निसर्गाने किती किती रंग बहाल करून आपला आयुष्य सुंदर करून टाकलय. निळ आकाश, हिरवी गार झाडं, निळाशार समुद्र, सोनेरी उन्ह, लाल सुर्य्बिम्ब, पान्ढरेशुभ्र चांदणे, श्रावणातले इन्द्रधनुष्याचे रंग, घ्या किंवा पहाटेचे क्षितिजावरचे रंग! . फुलांचे रंग घ्या किंवा फुलपाखराचे. मोराचा पिसारा बघा किंवा खोल खोल समुद्रताले वेगवेगळे जीव. उधळन नुसती.

हे रंग आपल्या आयुष्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या साहित्यात, किंवा कुठल्याही व्यक्त करण्यात किती खोलवर झिरपलेत. “रागाने लाल झाला”,”लाजुन गाल गुलाबी झाले”, किंवा “लाजेने चेहरा काला ठककर पडला”, “घाबरून पांढरा फट्टक पडला” हे सगळे वाक्प्रचार नेहमीचेच. “पिवाळाधम्मक चाफा”,”लाल चुट्टुक गुलाब”,”पळसाचा भड़क केशरी रंग”,”हिरवगार रान”…ही सगळी मित्र मंडळी प्रत्येक पुस्तकात भेटणारी. “लाल” म्हणजे धोका, थाम्बा, किंवा प्रेमाचा रंग (आधीचे दोन संकेत प्रेमात सुद्धा सांभाळावे लागतात हा योगायोग आहे का?), “हिरवा” म्हणजे चला, किंवा समृद्धि च रंग, नीळा म्हणजे शांत, गंभीर, आणि व्यापक, पांढरा म्हणजे शांतता, काला म्हणजे अशुभ…असे कितीतरी संकेत आपल्याच नकळत आपण शिकतो. मूड चांगले असेल तर आपन आपोआप आपल्या आवडीच्या रंगाचे कपडे घालतो. मूड खराब असेल तर हाथ आपोआप dull colors च्या कपड्यांकडे वळतो.

आपल आयुष्य रंगीत करण्याबद्दल निसर्गाचे आभार मानुया. आणि आपल आणि दुसर्यांच आयुष्य बेरंग करणारे सगले रंग विसरून जावूया. happy holi.