Posts Tagged ‘ children ’

ससा तो कसा!

ससा तो कसा कि कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली…
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू हि शर्यत रे आपुली…

गोड गाणं. त्या दिवशी पिल्लू ला ऐकवत होते. पुढचे शब्द आठवेनात. म्हणून म्प३ मिळवून ऐकली. आणि चक्क एक आख्ख नवीन तत्वज्ञान सापडलं!
युरेका again .
ही गोष्ट मुलांना वर्षानुवर्ष सांगतोय न? slow but steady wins the race . बरोबर?
पण हल्ली जरा उलट होतंय. GT बियाणांच्या जमान्यात आहोत न. त्यामुळे कासवाचा steadiness , आणि सशाचा speed हे दोन्ही हवंय. आपल्याला ‘काससा’ हवाय. ‘सासव’ सुद्धा चालेल.
हे कूर्मगतीने जिंकण कालबाह्य होत चाललय. मुलं त्यामुळे confuse होत असावीत. moral of the story एक आणि प्रत्यक्षात काही वेगळंच. नाही?
जरा लक्ष देवून ऐकल गाणं तेव्हा हे दुसर कडवं ऐकलं आणि खजिना गवसल्याचा आनंद झाला मला.

‘हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे हे पाहुनिया ससा हरखला…’
आपला हा ससा होता सुरवातीला जरा गर्विष्ठ. मान्य.
शर्यतीच आव्हान पण त्यानेच दिल. मान्य.
गाफील देखील राहिला तो. हेही मान्य.
लेकीन सफर का मजा तो उसीने लुटा बॉस! जिंकायचं कसं हे त्याला नाही कळलं. पण जगायचं कसं हे त्याने शिकवलं!

आपल्या सशांना या शर्यतीत धावताना आपल ध्येय गाठताना कासवाची चिकाटी तर शिकवायलाच हवी पण त्याहून महत्वाचं हेही शिकवायला हवं कि ‘winning is not always important .’ ध्येयाकडे वाटचाल करताना त्या वाटेतला आनंद भरभरून घेता आला पाहिजे. पाखराचं गाणं ऐकता आलं पाहिजे. काही क्षण स्पर्धा विसरून झाडाच्या सावलीत निजता आलं पाहिजे.
आणि आम्हाला तुम्हाला ती सावली होता आलं पाहिजे.

शब्दांच्या पलीकडले!

कानात शिरत नाही का? बहिरा आहेस का? कानपुर में हरताल है क्या? ही वाक्य आपण येता जाता किती सहजपणे एखाद्याला बोलत असतो.
शनिवारी मात्र मी काही वेळासाठी का होई ना ह्या जगात प्रत्यक्ष प्रवेश केला. जव्हार ला प्रगति प्रतिष्ठान तर्फे चालवली जाणारी मूक बधिर विद्यार्थ्यांची शाळा आहे. वसतिगृह सुद्धा आहे. ही मूल अतिशय गरीब वर्गातली. आदिवासी पाड्यांमधली! आज पर्यंत कधीही आली नव्हती त्या आयुष्याची कल्पना! वास्तव. तिथली मूल जवळून पाहिल्यावर लक्षात आल की नशीबवान म्हणतात ते काय असत!
घरात टीवी वर गरिबीची, अशा अपंगांच्या शाळेचि चित्र बघून किंवा एखादी documentry बघून नाही कल्पना येवू शकत त्या जगाची. ती मूलं, त्यांना घडवणारे शिक्षक, त्यांची परिस्थिति, हे सगळं मुम्बइच्या चकचकीत सुखलोलुप सोन्याच्या पिंजर्यात बसून नाहीच समजू शकत कधी!
ह्यामुलांच आयुष्य म्हणजे निव्वळ अंधार. घरात पोटाला अन्न नाही. घालायला कपडा नाही. कानावर पडणारा प्रत्येक ध्वनि म्हणजे दगड फ़क्त. शाळा, डॉक्टर, ह्या गोष्टी म्हणजे luxuries, त्याही फाइव स्टार म्हणाव्या अशा. 
त्या अंधारात दिवा घेवून काही जगावेगळी ‘माणसं’ उभी आहेत. जन्म घेवूनही ज्यांना भविष्यच नव्हत अशांच्या आयुष्यात स्वप्न पेरू बघणारी.  
ह्य मुलानी आमच्यासमोर आदिवासी तारपा नृत्य सादर केल. कानावर सुर ताल काही पडत नसताना! एकही मूल चुकल नाही. संगीत असावं तर असं.
‘भाषा’  ह्या शब्दच अर्थ काय हे समजायचं असेल तर ह्या शब्दाशिवायच्या दुनियेत जावून यावं. माझी
दिड वर्षाची मुलगी त्यांच्या वर्गात जावून बसली. त्यांच्याबरोबर चित्र काढायला. त्यांच्याशी ती आणि ते तिच्याशी कुठल्या भाषेत बोलत होते हे ठावूक नाही. त्या वेळचा तिचा निष्पाप, कुठलेही ‘संस्कार’ न झालेला चेहरा, आणि मन, एखद्या कुपित बंद करून जपून ठेवावसं वाटलं मला. सहानुभूति दाखवण्यापेक्षा त्याना हे असं सहज आपल्या जगात सामावून घेण जास्त कठिण.
भाषा येणारे शब्दांना महाग, आणि शब्द सोडून बाकी सगळ्या भाषा जाणणारे हे खरे भाषा पंडित.

दिव्यांचं तोरण (परिक्षेतल्या…)

मला आजकाल सगळी मूलं सारखीच दिसतात. एक ठराविक भाव असतो त्यांच्या चेहर्यावर..निरागस. मग कितीही खट्याळ, हट्टी, असली तरी निष्पापच दिसतात सगळी आपोआप.
कोणी ओरडल की रडताना पण एक विशिष्ट गरीब भाव असतो. ज्याच्यामुळे समोर्च्याचा राग टिकू नए असा. मला तर कधी कधी मी किती क्रूर, अगदी कैकयी आहे असं वाटतं माझ्या मुलीच्या चेहर्यावरचा तो भाव बघून.  (मी लहान आहे म्हणुन, मोठा झाल्यावर बघून घेइन…असही असत कधी कधी.)
natural weapans आहेत ती त्यांची. 

मला आलेल्या एक मेल मधली काही pictures इकडे टाकतेय.
studants नी exam papers मधे लिहिलेली उत्तर आहेत ही. simply hilarious. 
ह्या अशा mails खर्या असतात की made-up असतात ते माहित नाही. पण imagination अफलातून असते.

 
  हे पहिल्या कार्ट्याचे दिवे..

हे पहिल्या कार्ट्याचे दिवे..

 काय विचार केला असेल त्याने. उघड्या डोळ्यांनी गोष्टींच्या जगात वावरत असेल हा.

 

हे दुसर्याने लावलेले

ATT00004

हे पोरगं तर कलाकार आहेच, पण त्याच्यावरचा teacher चा response वाचा. ईशान आणि निकुम्भ सर कॉम्बिनेशन असणार.

 

दिवा नंबर 3

ATT00003

कसली ही खाडाखोड? अंधार आहे अगदी शब्दशः (की चित्रशः ?). दिल चाहता है मधला मागच्या सीट वरचा सैफ आठवला.

हा नंबर ४ चा दिवा

ATT00007

कसली भन्नाट imagination आहे. फंडे क्लेअर आहेत याचे…

 

आणि हा पांडवातला पाचवा…

ATT00008

कुठून विचारला प्रश्न अस झाल असेल बाईंना /सरांना! जसा प्रश्न तसे उत्तर. चुक तरी कसं म्हणायचं या पोराला?

 

सही आहेत न एकेक? 😀 माझ्या डोळ्यासमोर कसले एकेक व्रात्य आणि निष्पाप चेहरे उभे राहिले हे वाचताना. या २ expresssions एकाच वेळी एकाच चेहर्यावर फ़क्त लहान मुलांच्या नांदू शकतात.