Posts Tagged ‘ global warming ’

कानफाट्या

मी office मधे बसून माशा मारतेय.
काम जास्त नाहिये. cyclone warning मुळे कही लोकं घरी गेली आहेत. जावं की न जावं हा मला पडलेला पेच आहे. कारण warning आल्यापासून बाहेर बघतेय, पावूस तर सोडाच, पण झाडाच पान सुद्धा हलत नाहिये. हे असं नेहमी का होतं हे कळत नाही. एखाद्या दहशतवादी संघटनेने हल्ला आयत्या वेळी cancel करणे; होम मिनिस्टर ची डरकाळी एइकुन, हे समजू शकते.

पण हवामान म्हणजे काही अल-कायदा नाही. हल्ली हल्ली या गोष्टी मला जीवनाच्या अति महान तत्वद्यानाकडे घेउन चालल्या आहेत. म्हणजे अणु-रेणू ला पण आत्मा असतो वगैरे. प्रत्येक वेळी मेट जे जाहिर करत ते याला कळत असणार. आणि ह्याचे बेत हा आयत्या वेळी बदलत असणार. (हा म्हणजे हवामान)

खर तर आपलं मेट डिपार्टमेन्ट हल्ला थोपवू शकतच नाही. फार तर फार , आणि अगदी कहर म्हणजे यंत्रणा थोडी कामाला लागते नेहमीपेक्षा जास्त. एव्हढच. म्हणजे कधीतरी प्रोजेक्ट fire वर असल्यावर सगळे मनातून उसना आव आणून वीकएंड ला काम करतात तस!(यालाच मग sincere, hard-working, pro-active वगैरे म्हणुन appraisal मधे गौरवण्यात येत) आणि हे त्यालाही माहितेय. तरी मग हल्ला cancel का करत असेल तो?
कारण मग ह्याच क्रेडिट कमी होतं न. अचानक ‘भोँक’ करून भाम्भेरी उडवण्याचा आनंद official लपाछुपी च्या खेळात नसतो! ‘मला माहित होतं तू असाच करणार ते…’ असं आपण बोललो की त्याचा ego भयंकर दुखावला जात असणार. शेवटी आपण सुद्धा त्याच्यावर इतके बेसावध वार केलेत आतापर्यंत, की त्याचा अधिकार सिद्ध करून दाखवण्याशिवाय त्याच्या कड़े तरी काय पर्याय आहे म्हणा.
anyways , पण एव्हढ मात्र खरं,
MET department always comes into picture when the situation is already met . एकदा कानफाट्या नाव पडल की हे असं असतं.

विनाश आणि उत्पत्ति

काल आणि आज दोन परस्पर विरोधी बातम्या वाचण्यात आल्या.
पहिली बातमी: इस्त्रो च्या शास्त्रद्न्यांनी अंतराळामधल्या काही महत्वाच्या जिवाणूंचा शोध लावला. प्राध्यापक जयंत नारळीकर यांचा या संशोधनात प्रमुख वाटा आहे.  हा शोध महत्वाचा असण्याच कारण म्हणजे या मुळे पृथ्वी वरच्या जीव सृष्टीच्या उत्पत्तिवर प्रकाश पडेल. पृथ्वी च्या वातावरणा बाहेरच्या थरातून हे जीवाणु सापडले असून त्याचे नमूने इकडच्या जिव सृष्टीशी साधर्म्य दाखवतात.
दूसरी बातमी: सियाचिनची हिमनदी ध्रुवेतर भागामधली जगातील दुसर्या क्रमांकाची हिमनदी आहे. ती आक्रसत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.  ही global warming ची म्हणजेच पर्यायाने माणसाच्या उप्द्व्यापंची देणगी आहे. जगभरातील तापमान वाढण्याबद्दल गेल्या काही वर्षात बरेच लिहिले वाचले गेलेले आहे. माणसाची हाव न थांबल्यास उत्तर ध्रुव उन्हाळ्यात बर्फ विरहीत होण्यपासुन, ते समुद्रनाजीक ची महत्वाची शहरे बुड्ण्यपर्यन्त, आणि जगभरातील हवामानाची चक्र उलटी फिर्न्यापर्यंत अनेक परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. 
निसर्गाच्या चक्रा प्रमाणे, हिमयुग हे पुन्हा अवतरेलच. पण त्याची गति वाढवण्यास सम्पूर्ण मानवजात हिरीरीने हातभार लावते आहे. 

या दोन्ही बातम्यातील विरोधाभास पाहून माणसाच्या बुद्धीच्या व्याप्तिच्या आणि विचारातील भिन्नातेच्या कक्षा फार वेगळ्या स्वरूपात दिसतात.
एकीकडे जगाच्या उत्पत्ति च शोध लावण्यासाठी माणूस आपली सगळी शक्ति पणाला लावतो आहे. याच ध्यासाने मानाव्जातिची उत्क्रांति घडवून आणली. दूसरी कड़े तोच ध्यास जेवा अतीरेकी रूप धारण करू लागला तेव्हा त्यातच जगाच्या विनाशाची बीजे रोवली गेली.

आज जरी information age असल तरीही तय information च योग्य वापर होण जास्त महत्वाच आहे. पर्यावरणाच्या, global warming च्या, इंधन तुटवाड्याच्या प्रश्नांची माहिती बहुतेक सगळ्याच देशातील सुशिक्षित  जनतेला आहे. पण त्यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची मानसिक तयारी अजुन होताना दिसत नाही. अजुनही आपल्या हयातीत तर प्रलय होणार नाही न , मग कशाला जगाची चिंता वहा..हा प्रवाह मोठ्या प्रमाणावर आहे.
स्वतःच्या घरापासून सुरवात करता येणार असली तरी तेव्ह्ढ्याशाने काय होणार असे म्हणत प्रत्येक जण दार बंद करून घेताना दिसतो. मग ती कृति अनावश्यक दिवे बंद करण्याइतकी छोटी (?) का असेना.
अजुनही नवनवीन शोध लावण्याची उर्मी माणसाला स्वस्थ बसून देत नाही. हे चांगले लक्षण आहे. पण त्या उर्मीला न्याय देताना जी उपकरणे, तन्त्रद्यान लागते ते निर्माण करताना देखिल फार प्रचंड प्रमाणावर इंधन खर्च होत,  घातक वायु, रसायन सोडली जातात, electronic आणि nuclear कचार्याची निर्मिती होते.
या बाबतीत सगळ्यांचाच approach ‘सो चूहे खाके बिल्ली चली हज को’ असा असलेला दिसतो.

विनाश आणि उत्पत्ति हे चक्र जरी  नैसर्गिक असल तरी ते नैसर्गिक क्रमाने होणेच चांगले. आज विनाशाची गाती मानवजात आपल्या हातानेच वाढवते आहे. आपण काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आज गरजेचे आहे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण केवळ एक समस्यांनी ग्रासलेल जग द्यायची तयारी करतो आहोत हे निश्चित.