काहीतरी लिहायचच अस म्हणत जेव्हा कीबोर्ड हातात घेतला तेव्हा
शब्द इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटले
विचारांची फजिती बघत खो खो हसत सुटले आणि
खिजवत राहिले वाकुल्या दाखवत
नाचवत राहिले डोळ्यापुढे नेहमीचीच
झाडं बिड  , फुलं पानं , चंद्र तारे, रंग बिंग
लपवत राहिले त्यांच्या आड
प्रेम बीम, वेडी स्वप्न , ठसठसणारी दुःख बिक्ख
गोंधळलेली बोट नाचत राहिली या दगडावरून त्या दगडावर
उमटलेल पुसत काही आणि पुसलेल पुन्हा उठवत…

जेव्हा जेव्हा हे असे सगळे फितूर होतात तेव्हा तेव्हा
एकटेपणा एकटाच तेव्हढा प्रामाणिक राहतो माझ्याशी!

कविता सुद्धा तेव्हाच सुचतात म्हणे
हळव्या, गहन , आर्त बिर्त…

 1. Reblogged this on Nileshalate's Blog.

 2. Khupach chan..asa baryachada hot..je lihayach asat te lihayach rahunach jaat….

  • Milind Mohan Arolkar
  • September 12th, 2013

  Good one…

  • ajay shelar
  • August 17th, 2016

  अगदी खरे आहे ………..अनेकदा असे होते ……पण माझा अनुभव तर असा आहे …फक्त पाउस आणि तिच्याविषयी काही लिहायचे म्हंटले ना कि शब्द अगदी शाळेतल्या मुलांसारखे दुडूदुडू आसपास खेळू लागतात…..खोल काळजात जेव्हा उठते एखादी कळ शब्दांना लागते मग आतल्या वेदनेची झळ…..वेदना बोलते मग प्रत्येक पाना-पानावर ….अदृश खोल चरे उठतात आतल्या खोल मनावर …..(अजय शेलार )

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: