Posts Tagged ‘ politics ’

एव्हढ जमेल? आपल्यापैकी प्रत्येकाला?

एकीकडे महाराष्ट्र नावाच्या आपल्या ‘नावाला न जागणार्या’ राज्यात प्रत्येक छोट्या आणि मोठ्या गोष्टीवरून निरर्थक वाद चालू असताना, आपल्या देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिके सारख्या (अजूनपर्यंत तरी) महासत्ते समोर भारताची विविध विषयांवरची भूमिका अतिशय चातुर्याने आणि खंबीर पणे मांडत आहेत..
कुठे आपल भाषिक स्वार्थी राजकारण, त्यावरून दिवाणखान्यात रंगणार्या चर्चा आणि कुठे आपल्या पंतप्रधानांचं रोख ठोक विधान :” काश्मीर च्या सीमा पुन्हा आखण्याचा प्रश्नच येत नाही’
कुठे आपल २६/११ च्या घटनेच किळस आणणार राजकारण आणि कुठे त्यांच निर्भीड वक्तव्य: ” We should not harbour any illusions that a selective approach to terrorism , tackling it on one place while ignoring it in others, will work”.

कुठे आहोत आपण? जगासमोर आपले पंतप्रधान आपल्या देशाची समर्थ भूमिका निर्भय पणे, भारताच्या अस्मितेला कुठेही धक्का न लागू देता मांडत आहेत. हे करताना देखील त्यांना या सत्याची पूर्ण जाणीव आहे कि अमेरिकेला आपली आणि आपल्याला अमेरिकेची गरज आहेच. Doller च वर्चस्व निर्विवाद पणे मान्य करत ते एकीकडे अमेरिकेचा इगो तर सांभाळत आहेतच पण त्याच बरोबर भारत प्रगतीपथावरच्या देशांचे हक्क पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली विसर्जित करणार नाही हेही स्पष्ट करत आहेत. ह्या परिस्थितीत (नव्हे एरवी देखील) आपण केवळ ‘भारतीय‘ असायला नको का?

आपण मात्र देशआधी विचार करतो आपल्या धर्माचा, धर्माआधी आपल्या जातीचा, आणि आपापल्या सोयी प्रमाणे आपल्या भाषेचा. आपला पोकळ अभिमान आपल्याला कुठेही पोचवू शकत नाही.
या भ्रष्ट व्यवस्थेचे भाग बनून राहण्यात आणि कुठल्यातरी मसीहा ची वाट पाहण्यात आपण आपली सोयीची पळवाट आणि तात्पुरती सुरक्षा शोधली आहे. आपण म्हणजे एरवी असामान्य म्हणवून घेवू पाहणार्या सामान्य जनतेने. आपण म्हणजे बहुसंख्य शहरी मध्यमवर्ग. सगळ्यात पळपुटा. सगळ्यात बुद्धिवादी सुद्धा.
आपण धन्यता मानतो ते राजकारण्यांचे, फिल्म स्टार्स चे, क्रिकेट चे, आणि media चे उथळ मथळे आणि सवंग चर्चा पाहण्यात. आत आत जावून कधी करणार विचार? आपल्याला अभिमान दुसर्याच्या कर्तुत्वाचा. शिवाजी जन्माला यावा तो दुसर्याच्या घरात. तेही ठीक. पण निदान स्वतःच्या घरात एक मावळा तरी घडवायचा प्रयत्न करणार आहोत का आपण? मावळा म्हंजे ‘मराठी माणूस’ असा संकुचित अर्थ इथे अभिप्रेत नाही. मावळा प्रतिक आहे, निष्ठेच, प्रामाणिक पणाच, शौर्याचं, झोकून देण्याच. ही निष्ठा असावी फक्त देशाच्या प्रती. कुठलाही संकुचित भाषिक, प्रांतिक, धार्मिक राजकारण ज्या निष्ठेला धक्का लावू शकणार नाही अशी निष्ठा.
जपान मधली एक गोष्ट आठवते. राखेतून
उभा राहिलेला हा देश. निव्वळ राष्ट्राभिमान, आणि चिकाटीच्या जोरावर.
तेथील नागरिकांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला : “देशातल्या राजकारणाचा, भ्रष्ट व्यवस्थेचा, नोकरशाहीचा तुमच्यावर परिणाम होत नाही का? तुम्ही अस्वस्थ होत नाही का?”
यावर तिकडच्या नागरिकांनी दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे: “आम्ही या negative गोष्टींचा मूळी विचारच करत नाही. फक्त स्वतःच काम मात्र पूर्ण प्रामाणिक पणे आणि निष्ठेने करतो”
आणि प्रत्येक जपानी नागरिक जर हे करत असेल तर मुठभर भ्रष्ट लोकांच कितीस फावणार? शेवटी एकत्रित परिणाम हा प्रगतीकाराकच असणार न?
किमान एव्हढ तरी जमेल का कधी आपल्याला? आपल्यापैकी प्रत्येकाला?
शेतकऱ्यापासून, कामगारापासून, हवालदारापर्यंत.
कारकुनापासून, कचरेवाल्यापासून, शिक्षकापर्यंत.
व्यापार्यापासून, संशोधाकापासून, डॉक्टर-engineer पर्यंत,
ट्राफिक पोलिसापासून, कारखानदारापासून, सैनिकापर्यंत.
नगरसेवकापासून, पत्रकारापासून, मुख्यमंत्र्यांपासून, पंतप्रधानांपर्यंत!

conspiracy

हल्ली हे अस का होत कळत नाही. खूप काही लिहावसं वाटत. पण तो टेम्पो च येत नाही. इतक्या विषयांची गर्दी असते आजू बाजूला. पण कोणताच विषय आवडत नाहीये सध्या. तशी माझी मत खूप strong आहेत बर्याच विषयांच्या बाबतीत. कधी कधी जरा अतीच. पण हल्ली हल्ली खूप गोंधळायला होतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन किंवा अनेकदा दोनपेक्षा जास्तच बाजू असतात. आणि कधी कधी सगळ्याच बाजू पटतात देखील. म्हणजे राज ठाकरे ची मुलाखत बघितली कि त्याचं पटत. मग एखाद सुंदर संपादकीय वाचलं, ठाकरे आणि अबू आजमी special , की त्यांचा anti Raj view सुद्धा पटतो. आणि मग त्यावर पुन्हा एखाद प्रत्युत्तर असतंच. ते पण त्याच्या जागी योग्य वाटत. हल्ली हे सगळ्याच बाबतीत होत. Too much information is enough to confuse and at times paralyse a person ‘s thought process !
युरेका….exactly हेच करतय media आणि आपले politicians .
जनतेची विचार करण्याची क्षमता. त्यावर ह्यांचं सगळ अस्तित्व अवलंबून आहे. तिच्यावरच हल्ला करायचा. कधी लोकांना अशिक्षित ठेवून, कधी त्याना आमिष दाखवून आणि कधी त्यांना दिशाहीन करून. आणि ही conspiracy समजत असूनही आपण दिशाहीन होण पसंत करतो हे त्याहूनही भयानक सत्य आहे.
कारण एक दिशा धरून शेवटपर्यंत वाटचाल करणं हे दिशाहीन असण्यापेक्षा खूप कठीण आहे. आणि हे तुमच्या आमच्या पेक्षा त्या धूर्त लांडग्यांना चांगलच माहित आहे. याला म्हणतात public ची नस ओळखण!