Posts Tagged ‘ taalibaan ’

रात्र वैऱ्याची आहे

अजुन एक काळा दिवस. या वेळी क्रिकेट च्या इतिहासातला.
पुन्हा एकदा ‘so and so country condemns this attack’ चे मथळे. पुन्हा एकदा आरोप, प्रत्यारोप, पुन्हा तेच गुळगुळळित निषेध आणि त्याच त्या धमक्या.
नशिबाने हा terrorist attack मुंबई मधे घडला नाही. नाहीतर पुन्हा सामान्य मुंबई करांच्या नाईलाजाला आणि हतबल पणाला ‘स्पिरिट ऑफ़ मुंबई’ च्या सुशोभित वेष्टनात गूंडाळून मीडिया ने विक्रीला ठेवल असत. 

खर पाहिल तर चांगल-वाईट, योग्य अयोग्य याच्या व्याख्या किती सरल असतात. ब्लैक and व्हाइट. त्यानुसार त्याच्यावरच्या उपाय योजना सुद्धा…सोप्या नसतील तरी ठोस आणि clear असाय्ल्या हव्यात. पण मग त्यात कोणाचा तरी स्वार्थ येतो, कोणाचे तरी हित-सम्बन्ध जपण आल, सामर्थ्याची स्पर्धा आली, कोणाचे तरी कोणावर उपकार असतात (अर्थात मैत्री च्या किंवा सहकार्य च्या नावाखाली) आणि या सगळ्यात तो सरल आणि परखड उपाय, तो आवाज कुठेतरी दडपून जातो. एक साध सरल समीकरण ज्यातून प्रॉब्लम खरच सुटू शकतो ते इतक काम्प्लेक्स होत की तो अजुन गुंतत जातो. मग स्पष्टीकरण शोधण्याची धडपड. जबाबदार्या झटकणं. त्यातून येतात बेजबाबदार वक्तव्य, मग गोंधळ अजुनच वाढत जातो. अंहकार दुखावले जातात. मुळ प्रॉब्लम बाजुलाच राहतो आणि आधी स्वतःच्या अहंकारावरचा हल्ला परतवण्याची तयारी सुरु होते…
एक रसायन, अतिशय जिवघेणं, अतिशय घातक उकळायला लागत. कधीतरी ते त्याच्या saturation point ला पोचणार असत. आणि एका स्फोटात सगळ नष्ट करणार असत. ते दिव्यास्त्रा सारख असत. एकदा सुटल की परत घेता येत नाही. कोणाचातरी जीव घेउनच ते शांत होवू शकत. आणि हे सगळ्यान्ना च माहीत असत.तरीही…?

तेच उकळायला ठेवलय सगळ्या मानव जातीने मिळून. कधी त्यात तालिबानी रस ओतातात, तर कधी अमेरिका. कधी चीन तर कधी लश्कर. कधी ISI, तर कधी इरान…

काहितरी अपरिहार्य आणि अप्रिय घडणार आहे नक्की. रात्र वैऱ्याची आहे…