Posts Tagged ‘ philosophy ’

ससा तो कसा!

ससा तो कसा कि कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली…
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू हि शर्यत रे आपुली…

गोड गाणं. त्या दिवशी पिल्लू ला ऐकवत होते. पुढचे शब्द आठवेनात. म्हणून म्प३ मिळवून ऐकली. आणि चक्क एक आख्ख नवीन तत्वज्ञान सापडलं!
युरेका again .
ही गोष्ट मुलांना वर्षानुवर्ष सांगतोय न? slow but steady wins the race . बरोबर?
पण हल्ली जरा उलट होतंय. GT बियाणांच्या जमान्यात आहोत न. त्यामुळे कासवाचा steadiness , आणि सशाचा speed हे दोन्ही हवंय. आपल्याला ‘काससा’ हवाय. ‘सासव’ सुद्धा चालेल.
हे कूर्मगतीने जिंकण कालबाह्य होत चाललय. मुलं त्यामुळे confuse होत असावीत. moral of the story एक आणि प्रत्यक्षात काही वेगळंच. नाही?
जरा लक्ष देवून ऐकल गाणं तेव्हा हे दुसर कडवं ऐकलं आणि खजिना गवसल्याचा आनंद झाला मला.

‘हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे हे पाहुनिया ससा हरखला…’
आपला हा ससा होता सुरवातीला जरा गर्विष्ठ. मान्य.
शर्यतीच आव्हान पण त्यानेच दिल. मान्य.
गाफील देखील राहिला तो. हेही मान्य.
लेकीन सफर का मजा तो उसीने लुटा बॉस! जिंकायचं कसं हे त्याला नाही कळलं. पण जगायचं कसं हे त्याने शिकवलं!

आपल्या सशांना या शर्यतीत धावताना आपल ध्येय गाठताना कासवाची चिकाटी तर शिकवायलाच हवी पण त्याहून महत्वाचं हेही शिकवायला हवं कि ‘winning is not always important .’ ध्येयाकडे वाटचाल करताना त्या वाटेतला आनंद भरभरून घेता आला पाहिजे. पाखराचं गाणं ऐकता आलं पाहिजे. काही क्षण स्पर्धा विसरून झाडाच्या सावलीत निजता आलं पाहिजे.
आणि आम्हाला तुम्हाला ती सावली होता आलं पाहिजे.

बरेच प्रश्न पडतात रोज…

बरेच प्रश्न पडतात रोज. आज काल जरा जास्तच.
का जगतोय? असे का जगतोय आपण? आयुष्यात कधीतरी निदान काहीतरी अर्थ सापडणार आहे का? किती दिवस, वर्ष, महीने आपण हे अस चाकोरीतलं आयुष्य जगणार आहोत? काहीतरी अर्थ कधीतरी देणार आहोत की नाही? कुठल्यातरी ध्येयाने कधीतरी झपाटून जाणार आहोत की नाही? की आयुष्यभर, आपल घर, मूल, बैंक बैलेंस, आणि दोन वेळच्या जेवणाचे मेनू ठरवत राहणार आहोत?
आयुष्य इतक अळणि कधी झाल? आठवत नाही. पण समाधानाच्या तुटपुंज्या कल्पनांभोवती फिरत असतं आपलं ज्ञगणं. कधी येणार धाडस, त्या झुगारून देण्याचं? कोणी ठरवलं चांगलं काय आणि वाईट काय? कोणीतरी…माहीत नाही. पण आपण मात्र आन्ध्ळेपणाने सगळं स्वीकारून मोकळे!
कोणी ठरवलं ही कामं बायकांची आणि ही पुरुषांची? कोणी ठरवलं चूक आणि बरोबर? काय व्याख्या? आजपर्यंत मलातरी नाही सापडली. समोरचा माणुस जो पर्यंत आपल्या मताने वागत असतो तो पर्यंत तो बरोबर, चांगला. आणि त्याने आपल्या मतापासून फारकत घेतली की तो चुक? मग लगेच निंदा नालस्ती, रुसवे फुगवे, आरोप, मनस्ताप. कधी दुसर्याला, कधी स्वतःला.
का प्रत्येक माणुस आपापल्या जागी नेहमी बरोबरच असतो?
कोण ठरवत की दुसर्याला दुखेल अस वागायाचं नाही? हे सुद्धा सापेक्ष नाही का? नेहमीच दुसर्याच्या अपेक्षा, इच्छा योग्य असतीलच कशावरून? मग अयोग्य असेल तरी न दुखावता वागायाच की योग्य मार्ग निवडायचा? पुन्हा योग्य काय आणि अयोग्य काय हा प्रश्न उरतोच? कोणी ठरवल? ‘समाज’ नावाने आपण ज्याला ओळखतो त्या काही बलाने आणि बुद्धीने जास्त असणार्या समुदायाने? कारण इतिहास जसा नेहमी जेत्यांचा असतो तसाच समाजाचे नियम, चांगल्या वाईटाचे निकष हे देखिल जेतेच ठरवत असतात.
आणि प्रत्येक गोष्ट चुक की बरोबर , योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला दिला कोणी? का अट्टहास सगळंयानी आपल्या कल्पनांना स्वीकारून जगावं हा?
प्रत्येकाने एक मर्यादेनंतर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्विकारालीच पाहिजे न? घेतले काही निर्णय चुकीचे तर त्याची शिक्षा मिळत असतेच आपोआप. त्यात आपण का भर घालायची कावळ्यासारखे टोचून एखाद्याला? चुकतच प्रत्येकच कधी न कधी. चुकू दे न. काय बिघडलं? आपल्या तंत्राने जग चालवायला काय आपण देव आहोत?
पुन्हा आलाच प्रश्न चूक काय आणि बरोबर काय?
कुठेतरी मोकळ करता आलं पाहिजे न? नियमांच्या चाकोरीतून, चांगल्या वाईटाच्या जुनाट कल्पनांमधून. आयुष्य एकदाच मिळतं. तेहि जर धाड़साने स्वतःच्या मनाप्रमाने जगता येत नसेल, त्याला स्वतःच्या संसारा पलिकडे जाउन काही अर्थ देता नसेल, तर काय उपयोग? मरण्याआधी देवा समोर उभं राह्ण्या आधी, स्वतःच्या नजरेला नजर देता यायला नको?
बरेच प्रश्न पडतात रोज. आज काल जरा जास्तच.