Posts Tagged ‘ Delhi 6 ’

Delhi-6

कालच Delhi-६ पहिला. आवडला.
खुप लांब लचक असुनही, बऱ्याच घटनांची सर-मिसळ असुनही, आणि मीडिया ने बऱ्याच शिव्या घातलेल्या असुनही…
Cinematography असो की A R Rehmaan च music, रामलीला असो की इंडिया मधल्या मीडिया चैनल्स च reflection असो. हा चित्रपट भारतीय समाजाची नाळ अचूक पकडतो.
टिपिकल lovestory ची अपेक्षा घेउन जाणार्यांची यात नक्कीच निराशा होईल. कारण lovestory हा या चित्रपटाचा अगदी छोटा भाग आहे. तोही अतिशयोक्ति न करता अगदी नैसर्गिक पद्धतीने develop केलेला आहे. दोन शिकल्या सावरलेल्या सद्यान तरुणांमधे जशी फुलेल तशी lovestory आहे. पण त्याहून कितीतरी धीर गंभीर आशय या चित्रपटाने मांडलाय. भारतीय समाजातल्या कितीतरी विसंगति फार नेमक्या टिपलेल्या आहेत.
या चित्रपटात काहीही घडत नाही आणि तरीही बराच कही घडत राहत. पण त्यापेक्षाही महत्वाच आहे ते हे की असे आशयघन चित्रपट बघून आपल्या आत काही घडत की नाही हे!
कुठल्याही संवेदनशील भारतीय माणसाला आवडेल असा हा चित्रपट आहे.
रामालीले च्या माध्यमातून भाष्य करण्याची दिग्दर्शकाची कल्पना अप्रतिम. अतुल कुलकर्णी नेहमीप्रमाणे उस्फुर्त आणि अचूक. रेहमान चा कव्वाली पासून लोकगीता पर्यंत असणारा संगीताचा अभ्यास चकित करणारा.
भारतीय समाजाच प्रतिबिम्ब दाखावणारा ‘आरसा’ हे प्रतिक वापरण्याची कल्पना सुद्धा चपखल.
नक्की पहा.