Posts Tagged ‘ पेपर ’

गेले बरेच दिवस हे चालु आहे

गेले बरेच दिवस हे चालु आहे. सकाळी सकाळी पेपर उघडला की दोनच प्रकारच्या बातम्या. पाकिस्तानात कोणी न कोणीतरी धुमाकुळ घातलेला असतो. किंवा बीजेपी-सेना , कांग्रेस-राष्ट्रवादी, इत्यादि इत्यादि जगावाटपा वरून भांडत असतात. दुसर काही नाहीच. अशावेळी मला माझ्या लहानपणीची मासिक आठवतात. ‘चम्पक’, ‘चांदोबा’,’किशोर’…
आज काल ती आणून वाचाविशी वाटतात.  किंवा मग टुकार फ़िल्मी मासिक. filmfare, मायापुरी, चंदेरी वगैरे. काहीच नाही तर मिड-डे, बॉम्बे टाईम्स वगैरे सुद्धा बरी वाटायला लागतात.

एक बाकी बघितलत का? निवडणुक जवळ आल्यानंतर सग्ळे पक्ष जनतेचे पश्न कसे विसरून गेले ते? 

“दहशतवाद? कोण तो?
ताजवर हल्ला? असल्या छोट्या मोठ्या घटना व्ह्याय्च्याच.
आर्थिक संकट? तुम्हाला न प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लम चा बाऊ करायची सवय लागलेली आहे.

इकडे आमच्या समोर किती मोठे प्रश्न आहेत माहित आहे?
आणि आम्ही हे सगळ आमच्यासाठी थोडाच करतोय? तुमच्या भल्यासाठीच चाललय हे सगळ.  तुम्हाला एक चांगला नेता मिळावा, दारीद्र्यात आणि दुःखात खितपत पडलेल्या तुम्हा क्षुद्र पापी जिवांचा उद्धार करणारा तारणहार मिळावा म्हणुन चाललय हा खटाटोप. 
शेवटी ही लोकशाही आहे. हा काय पाकिस्तान आहे का? एकमेकांच्या जिवावर उठायला? हे सग्ळे प्रयत्न सग्ल्यान्ना बरोबर घेवून न भान्डता राज्यकारभार करता यावा म्हणुन आहेत. नाहीतर तुम्हीच म्हणाल की या राजकीय पक्षांना फ़क्त एकमेकांची उणी दूणी काढता येतात. शेवटी आपली संस्कृती काय शिकवते आपल्याला? सगळ्यांना सांभाळून घ्या. त्यातच सगळ्यांचा फायदा आहे. एक तीळ सात जण वाटुन खातात ही आपली संस्कृती. आम्ही सुद्धा सगळे वाटुन खाय्च्याच मागे आहोत. तुम्ही मात्र आम्हाला आप्पलपोटे ठरवून मोकळे झालात…शेवटी तत्वांचा झगडा असला तरी तत्व ही काही जीवंत माणसांपेक्षा मोठी आहेत का?”

मी आपली अशावेळी बॉम्बे टाईम्स सारखा पेपर उघडून आणि मेंदू बंद करून बसते.