Posts Tagged ‘ मटा सन्मान ’

कर्तुत्व?

माझ्या मागच्या पोस्ट मधे वेळे अभावी बर्याच गोष्टी मांडू शकले नाही म्हणुन तोच मुद्दा जरा अजुन विस्ताराने मांडते आहे.

दुसर्या भाषेबद्दल मला अजिबात आकस नाही (मराठी माणसाला मराठी न येण किंवा त्यांनी मातृभाषेला हिंदी किंवा इंग्रजी पेक्षा कमी लेखण हा वादाचा मुद्दा आहेच पण या संदर्भात आता लिहित नाहिये). हिंदी फिल्म इंडस्ट्री बद्दल सुद्धा problem नाही. शेवटी मी सुद्धा माझ्या जीवनातल्या बर्याचशा fantasy आणि स्वप्नांबद्दल हिंदी फिल्म्स ची आभारी आहे.

पण Problem असा आहे की ‘कर्तुत्वा ची व्याख्या किती superficial झाली आहे! कोणत्याही कामाला आपण कर्तुत्व कस म्हणु शकतो? e.g. स्वबलावर आपला धंदा उभा करणारा किंवा स्वतःच्या गावाच्या विकासासाठी प्रामाणिक पणे योजना राबवणारा एक माणूस हा microsoft मधे काम करणार्या पिऊन पेक्षा जास्त कर्तुत्ववान नाही का? की फ़क्त तो microsoft मधे काम करतो म्हणुन त्याची brand value जास्त? या पेक्षा चांगल उदहारण आता सुचत नाहिये पण असच काहीतरी वाटत हे पुरस्कार पाहून. त्यातुनही खरोखर तशीच कामगिरी केलेली असेल तर हरकत नाही. अगदी फाड़्फाड english मधे बोला आम्ही खपवून घेऊ. पण आधी तेव्हढी ऊँची गाठा!
मी परवा दूरदर्शन वर Dr. रामानी यांची मुलाखत पाहीली. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या spine surgeons पैकी ते एक आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी 12-12 तासांच्या surgery करतात. पण आजही ते स्वतःच्या जन्मगावी medical camps भरवातात दर वर्षी. हा माणूस उत्तम मराठी मधे मुलाखत देवून गेला TV वर. गर्वाचा मागमुस नाही. की मोठे मोठे शब्द वापरून स्वतःच ञान दाखवण्याचा हव्यास नाही. अशी माणस या पुरस्करांच्या माध्यमातून समाजापुढे यायला हवीत. फ़क्त tv आणि filmstars नव्हेत. त्यातुनही जर हा एखादा filmy पुरस्कार सोहळा असेल तर ठीक पण मटा सन्मान ला एक व्यापक पार्श्वभूमी आहे. मटा हे दैनिक आज घरा घरात वाचाल जात. त्यांची सामान्या पर्यंत पोच मोठी आहे. वृत्तपत्र म्हणुन आवाका मोठा आहे. त्यांनी फ़क्त entertainment industry ला धरून राह्न्याच कारण नाही. ते आपल्या या माध्यमातून बरेच enterpreuners, वेगवेगळ्या inspirations लोकांसमोर आणि युवाकंसमोर आणु शकतात. अशा वेळी खर सोन सोडून हे bentex चे item समोर आणले की त्यांनी एक खुप मोठी संधि गमावली याच दुःख होत.

मराठी?

रविवारी मटा सन्मान पुरस्कार पाहिले. कोणीतरी फडनिस आणि मुग्धा गोडसे हिला सन्मानाने पुरस्कृत केल गेल.
या दोघी स्टेज वर येवून कस बस मराठी बोलल्या आणि सवयी प्रमाणे इंग्रजीचा आधार घेत त्यांनी आपल आभार प्रदर्शन पूर्ण केल. ही किंवा अशी मंडळी जेव्हा हिंदीत झेंडे गाडून अशा कार्यक्रमाला येतात तेव्हा कधी तोडक्या मोडक्या आणि कधी अस्खलित मराठीत बोलतात. याच प्रेक्षकांना कोण कौतुक असत? का? मातृभाषा आहे त्यांची. अस काय मोठ केले त्यांनी मराठीत बोलून? बोलणार्यांच्या चेहर्यावर उपकार केल्याचे भाव आणि एइकणर्यच्या चेहर्यावर उपकृत झाल्याचे. कशाला?
का देता असले पुरस्कार? का पेक्षा कोणाला देता? ज्या व्यक्ति मराठी बोलू शकत नाहित? किंवा मराठी असून ज्याना ती आपली भाषा वाटत नाही त्यांना? किंवा कितीही छोटी किंवा मोठी भूमिका असली तरी चालेल पण हिंदी चित्रपट स्रुष्टित प्रवेश झाला की ती व्यक्ति कौतुकास पात्र आहे अस समजायाच? कर्तुत्वाची व्याख्या काय? आज त्यांनी भूमिका केलेले चित्रपट जर पडले असते तरी त्यांना पुरस्कार मिळाले असते? लोकप्रियता आणि कर्तुत्वा यांचा एकमेकाशी सम्बन्ध आहे पण ते सामान अर्थी शब्द नव्हेत. असे अनेक कर्तुत्ववान आहेत जे आज महाराष्ट्राच्या हिता साठी झटत आहेत. पण ते लोकप्रिय नाहित. त्यांना मटा ओळखत नाही? ही हिंदी चित्रपट सृष्टि ची गुलाम गिरी कधी संपणार? आपली किंमत आपल्याला कधी कळ्नार? जगभरात प्रत्येक क्षेत्रात कर्तुत्वा गाजवणारी मराठी माणस आज कितीतरी आहेत. मला त्यांचा रास्त अभिमान आहे. पण मग हिंदी चित्रपट हा निकष इतका महत्वाचा का आहे? मटा सारखी जबाबदार वृत्तपत्रे देखिल जेव्हा अशा उथळ विचारंच दर्शन घडवतात तेव्हा वाईट वाटत.

ज्या स्टेज वर प्रकाश आणि मंदा आमटे अत्यंत साधेपणाने आपल्या असामान्य कर्तुत्वासाठी पुरस्कृत केले जातात (ते सुद्धा त्यांना मग्सेसे मिळल्य नंतर..तो पर्यंत दुर्लाक्षितच) त्या स्टेज वर जेव्हा अशा उथळ निकषांवर आधारीत लोकांचा गौरव करण्यात येतो तेव्हा अस्वस्थ झाल्या शिवाय राहवत नाही.