Will Pinki smile?


कालचा दिवस भारावलेला होता. A.R. Rehmaan आणि गुलजार ही दोन्ही मला देवस्थानी!
त्या दोघांनाही oscar मिळाल्याची बातमी काल दिवसभर भोवती फिरत राहिली. आणि भारतीय असल्याचा अभिमान (खर तर विना कारण, आपला त्या यशात जराही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार नाही ) नेहमी प्रमाणे उफाळून आला.
रात्री channel surfing करत या न्यूज़ चे बाइट्स बघत राहिले. या मोठ्या ८ पुरस्करांच्या भाउंगर्दीत हळूच बोट वर करत पिंकी सुद्धा जणू सांगत होती, “मला पण मिळालाय पुरस्कार..”.
खरचं! glamourous चित्रपटांच्या कौतुकात मी या छोट्या पण खुप महत्वाच्या फ़िल्म ला विसरले होते. मलाच लाजल्यासारख झाल. कारण हा चित्रपट जास्त वास्तव आणि जास्त भारतीय होता. आणि पाठोपाठ पिंकी च्या गावातल celebration सुद्धा दाखवल गेल. तिच्या आईची मुलाखत. ज्या मुलीला याच समाजाने वाळीत टाकल होत तिच्या वेदनेला oscar मिळाल्यानंतर त्याच गावात ढोल ताशे बाडवले जात होते. ही विसंगति कितीतरी अस्वस्थ करणारी नाहीये का?
एखाद्याच्या दुःखाच्या क्षणी त्याला हात न देणारा समाज त्या दुःखाच बाजारीकरण झाल्यावर त्याच व्यक्तीला डोक्यावर घेतो? हा दांभिक पणा नाही का?
आपल्या समाजात अशा कितीतरी पिंकी असतील. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्याना या समाजात जगण असह्य झाल असेल. वेगवेगळ्या रुपात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनेत लपेट्लेल्या हजारो पिंकी. त्या सगळ्यांच्या दुःखाच हे अस प्रसिद्ध होण, त्याचं glamourization होण गरजेचं आहे? त्याशिवाय हा समाज त्यांना त्यांचं स्थान देवू शकत नाही? आपल्या समाजाचे चांगल्या वाइटाचे निकष किती कणाहीन आहेत त्याचा प्रत्यय या अशा गोष्टीतून येत राहतो वारंवार. या भारतीय यशाने मान वर व्हायला हवी की खाली हे अशा वेळी कळत नाही.
आजची पिंकी हे केवळ एक प्रतिनिधिक रूप आहे. उदया अशीच एखादी मुलगी जर पुन्हा मिर्जापुर मधे जन्माला आली तर तिला समाज सामावून घेइल? तसं झालं तर ते या documentry चं खरं oscar असेल.

  1. ए..आलीस..!! ये ये..!! Welcome..!!
    मस्त मस्त ब्लॉग..मला वाटलंच होतं की तू हे template वापरणार..मी पण आधी हेच सिलेक्ट केलं होतं..
    बाय द वे.. महेंद्र कुलकर्णींच्या ब्लॉगवर कोमेंट केलीय..बघ..अमेरिकन मराठी वाल्या ब्लॉगवर..

    • sonalw
    • February 24th, 2009

    Thanks. Mi suddha comment takliye. wach.
    ha blog day-to-day anubhav tipnyasathi aahe. mazya dusrya blogvar kavita aani kahi sfut takatach rahin. aajach ek kavita tithe publish keliye. wach aani abhipray kalav.
    sonal

  1. No trackbacks yet.

Leave a comment